भाजपने २४ तासांत घेतला निर्णय; आ. ढिकले यांना पुन्हा निवडणुकीची धुरा..
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना अचानकपणे हटवल्यानंतर पक्षांतरांत उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर भाजपने अवघ्या २४ तासांत आपला निर्णय परत घेतला आहे. आता आ. ढिकले यांच्यावर पुन्हा या पदाची धुरा सोपविण्यात आली असून, आ. फरांदे देखील त्यांच्या समवेत निवडणुकीच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुज्ञाने आता राजकीय वातावरण तापलेले आहे. पक्षांतील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, त्यामुळे अंतर्गत वाद विवाद काही अंश बाहेरही येऊ लागले आहेत.
निवडणूक तयारीच्या अनुज्ञाने भाजपने नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार आ. राहुल ढिकले यांच्यावर एकत्रित जबाबदारी सोपविली होती. मात्र, मुख्यमतदार येशील हाती कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाविरोधात काम केले तर पक्षाने पुन्हा स्थान मिळविलेल्यांना मनपा निवडणुकीत असमय दाखव, असे विधान केले होते.
या वक्तव्यानंतर पक्षाने आ. ढिकले यांच्या कडील मनपा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी अचानकपणे कानून घेत या पदाचा भार आ. फरांदे यांच्याकडे सोपविला होता.
शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सांगितले की, "महापालिका निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून अजून एक संघटनात्मक पद तयार करण्यात आले आहे. आता आ. अँड. राहुल ढिकले आणि आ. देवयानी फरांदे या दोघांवर नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे."
यापूर्वी आ. ढिकले यांच्या जबाबदारी काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये राग व्यक्त झाला होता. त्यामुळे पक्षांतरातून मतभेद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने अवघ्या २४ तासांत आपला निर्णय परत घेतला.


Shinde_Rupali 




