प्रभाग १७ : भाजपच्या जुन्या चेहऱ्यांना नव्या इच्छुक उमेदवारांचे तगडे आव्हान

प्रभाग १७ : भाजपच्या जुन्या चेहऱ्यांना नव्या इच्छुक उमेदवारांचे तगडे आव्हान

नाशिकरोड: शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग १७ मध्ये राजकीय प्रवेशांमुळे चित्र बदलले आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांसमोर डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिकीट वाटपानंतर बंडखोरीचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • भौगोलिक परिसर: गोदावरीच्या दक्षिणेकडील भाग, दसक गाव ते भीमनगरपर्यंत व कॅनलरोड झोपडपट्टी, इच्छापमणी मंदिर, अप्पू चौक, मकरंद कॉलनी ते टाकळी तिरुपती नगरपर्यंतचा भाग असलेल्या या प्रभागात १३१ कॉलनी, सोसायट्या व आठ मळे असा भौगोलिक परिसर आहे.

  • राजकीय समीकरणे: या प्रभागातून गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुमन आढाव, प्रशांत दिवे तर भाजपचे दिनकर आढाव व अनिता सातभाई निवडून आले होते. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने दिनकर आढाव, अनिता सातभाई यांच्यासोबतीला भक्कम पॅनलचा दावा केला आहे.

  • इतर पक्ष: दुसरीकडे भाजपकडून माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्या पत्नी रत्ना सातभाई, मंगेश मोरे, कैलास आढाव, राजेश आढाव, दीपक जाधव, महिलांमध्ये ज्योती जाधव, हर्षदा पवार, भक्ती शेलार, दीला कपिले, प्रमिला मैंद आदी नवे चेहरे समोर असल्याने जुन्यांसमोर पर्याय उभा राहिला आहे.

आरक्षण:

  • - एस.सी.

  • - ओबीसी महिला

  • - महिला (सर्वसाधारण)

  • - सर्वसाधारण

पुरुष उमेदवार:

  • दिनकर आढाव

  • प्रशांत दिवे

  • शैलेश ढगे

  • संजय भालेराव

  • कैलास आढाव

  • प्रमोद साखरे

  • विनायक आढाव

  • राजेश आढाव

  • मंगेश मोरे

  • धनंजय लोखंडे

  • राहुल कोथमिरे

  • बाळासाहेब शेलार

  • शशी उव्हवणे

  • नितीन चंद्रमोरे

  • विजय बोराडे

  • ॲड. शरद आढाव

  • दीपक जाधव

  • तुषार वाघमारे

  • सचिन शेजवळ

  • विशाल साळवे

महिला उमेदवार:

  • मंगला आढाव

  • अनिता सातभाई

  • रत्ना सातभाई

  • कुंदा सहाणे

  • दिपला कपिले

  • हर्षदा पवार

  • ज्योती जाधव

  • भक्ती शेलार

  • नीलम गडाख

  • प्रमिला मैंद

  • सुनीता चव्हाण

  • जयश्री आढाव

  • विजयता डावरे

  • मनीषा निरभवणे

  • प्रिती आढाव

  • संगीता खैरनार

 मागच्या निवडणुकीचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा https://nmc.minagarsevak.com/61