भाजपकडून आयात उमेदवारांना संधी, निष्ठावान कार्यकर्ते डावलले; नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले
नाशिकः भाजपने आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलले आणि निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना संधी दिली. यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीच वातावरण तापलेलं दिसून येतय. भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे काही इच्छुकांना तर ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली.
महापालिकेच्या या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी स्वबळाची तयारी करून देखील युती आणि आघाडी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भाज॒पने सुरवातीपासूनच स्वबळाची भाषा केली होती. त्यानुसार सर्वाधिक उमेदवार या पक्षाने दिले आहे.
कोणाचे किती उमेदवार
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी २३५७ ऐवढे उच्चांकी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी भाजपाने सर्वाधिक ११८, उमेदवार दिले असून देखील प्रभाग १४ मध्ये या पक्षाला एकही उमेदवार देता आलेला नाही.
भाजप ११८
शिवसेना (UBT)८२
शिवसेना (शिंदेगट)८०
राष्ट्रवादी (अजित पवार) ४१
मनसे ३४
राष्ट्रवादी (शरद पवार) ३१
एकीकडे कार्यकर्ते नाराज असतानाही, भाजपाने या निवडणुकीत तीन घरात दोन-दोन उमेदवारी देण्यात आली आहे. यात सुधाकर बडगुजर व त्यांचे पुत्र दीपक बडगुजर, कल्पना चुंभळे व त्यांचे दीर कैलास चुंभळे तसेच दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील अशा एकाच कुटुंबातील दोनजणांना उमेदवारी देण्यात आली आहे.दुसरीकडे भाजपमध्ये तीस-चाळीस वर्षे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. तरीही त्यांना उमेदवारी मिळत नाही त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
पंचवटीतील माजी नगरसेवक दामोदर मानकर, सुनिता पिंगळे यांना भाजपाने उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिंदे सेनेतून उमेदवारी मिळविली. कविता कर्दक या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका होत्या, त्यांना शिंदे सेनेकडून संधी देण्यात आली. सुनीता शिंदे या राष्ट्रवादी (अजित पवार) गटातून शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांना उमेदवारी देण्यात आली.
शिंदेसेनेत १९ तर उद्धव सेनेतून ९ आयात उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग २२ मधून शिंदेसेनेकडून वैशाली दाणी यांना उमेदवारी मिळाली. त्या शिंदेसेनेतून पक्षात आल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) तून शिंदेसेनेत आलेले कैलास मुदलीयार यांना पक्ष प्रवेशाचा लाभ झाला. माजी नगरसेविका शीतल भामरे या भाजपाच्या पदाधिकारी होत्या. त्यांनी ऐनवेळी शिंदेसेनेत प्रवेश करत प्रभाग २० मधून उमेदवारी मिळविली. प्रभाग २५ मधून अमोल नाईक यांना शिंदेसेनेने उमेदवारी देण्यात आली. ते राष्ट्रवादी (अजित पवार) कडून इच्छुक होते. मोनिका वराडे या भाजपकडून प्रभाग २९ मधून इच्छुक होत्या. त्यांना उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळाली.
कमलेश बोडके प्रभाग ५ मधून भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. भाजपवर नाराज झालेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील प्रेम पाटील यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली.


Shinde_Rupali 




