नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीची बैठक मनपा आयुक्त कार्यालयात संपन्न
नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पूर्वतयारीची बैठक आज मनपा आयुक्त कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीत मनपाच्या ६ विभागीय कार्यालयातील ३१ प्रभागासाठी होत असलेल्या निवडणूक कार्यक्रमात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना,सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या.या वेळी विविध विभागातील अधिकारी यांचा ओळख परिचय करून देण्यात आला.
मनपा निवडणुकी करिता नियुक्त केले विविध शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण सत्र, नागरिकांना उमेदवारी अर्ज दाखल करणे पासून निवडणूक निकाल लगे पर्यंत विविध विषयांवर चर्चा झाली.नाशिक महानगरपालिका निवडणूक कामकाज पारदर्शक पद्धतीने व बिनचूक राबविण्यात यावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावली नुसार निवडणूक पार पाडावी अशा सूचना लक्ष्मीकांत साताळकर उपायुक्त, निवडणूक विभाग यांनी केल्या.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Nmc_nagarsevak 




